तिरुवनंतपुरमध्ये डाव्यांच्या किल्ल्याला सुरुंग, NDA च्या मोठ्या विजयाने PM मोदी झाले भावूक
डाव्यांचा दबदबा असलेल्या केरळातील तिरुवनंतपुर महापालिकेतील ( LDF ) डाव्यांची सत्ता धुळीस मिळाली असून भाजपा-एनडीए सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. या विजयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी सद्गदित झाले असून त्यांनी या विजयाला केरळसाठी ऐतिहासिक म्हटले आहे.