माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी १९ डिसेंबरनंतर मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होईल असा खळबळजनक दावा केला आहे. अमेरिकेत सार्वजनिक होणाऱ्या एबस्टिन फाईल्समुळे भारतात मोठा राजकीय भूकंप होईल असे त्यांचे म्हणणे आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, विरोधकांनी टीका केली असली तरी काही नेत्यांनी त्यात तथ्य असल्याची शक्यता वर्तवली आहे.