नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिक कार्यक्रमाकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा पाठ फिरवली. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघाचे कौतुक करत शिवसेना-संघ विचारसरणी मिळतीजुळती असल्याचे म्हटले.