‘बिग बॉस 19’ च्या ‘या’ सेलिब्रेटीने गावातील लहान मुलांसोबत केली पार्टी; सर्वांना वाटला पिझ्झा

बिग बॉस 19चा एक स्पर्धक त्याच्या गावी परतला आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. हा सदस्य गावातील मुलांना खास पिझ्झा पार्टी देताना दिसत आहे. या सदस्याने मुलांना केवळ पिझ्झाच नाही, तर नोटबुक आणि पेन्सिल वाटून शिक्षणाचे महत्त्वही पटवून दिले. या व्हिडीओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे, अनेकांनी त्याला प्रेरणादायी म्हटले आहे.