'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मधून मिळालेल्या संधीनंतर आर्या आंबेकरने गाण्याचा घोटून रियाज करत आता एक उत्तम गायिका अशी ओळख मिळवली आहे. आर्याच्या आवाजातली अनेक मालिकांची टायटल साँग्स, चित्रपट गीतंही अतिशय प्रसिद्ध असून तिच्या सुमधुर आवाजाने तिच्या रसिकांच्या हृदयावर राज्य करते.