'धुरंधर'मधल्या रेहमान डकैतची व्यक्तिरेखा एवढी गाजत्ये की अक्षय खन्नावर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होतोय. फक्त सामान्य प्रेक्षकच नव्हे तर सेलिब्रिटी, नेतेही त्याच्या परफॉर्मन्सवर फिदा आहेत. मध्यंतरी बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाने अक्षयची तारीफ करत त्याला ऑस्कर देण्याची मागणी केली होती तर आता भाजप नेत्यानेही अशीच मागणी केली आहे.