BMC Election 2025: पालिका निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरे यांच्या भेटीला, ‘शिवतीर्थ’वर खलबतं, घडतंय काय?

महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर संजय राऊत आणि अनिल परब यांनी शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. आगामी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. मुंबईसह पुणे, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, संभाजीनगर या प्रमुख महानगरपालिकांमध्ये एकत्रित लढण्यावर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.