नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधींसह इतरांना मोठा दिलासा मिळाला आहे. राऊस अव्हेन्यू न्यायालयाने ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यास नकार दिला. विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांच्या या भूमिकेमुळे गांधी कुटुंबाला हे प्रकरण तात्पुरते का होईना, सुटकेचा निःश्वास घेता आला आहे. मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपावरून हे प्रकरण 2012 पासून सुरू आहे.