मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. कालच्या निकालानंतरही कोकाटे यांना अटक न झाल्याने हा अर्ज करण्यात आला आहे. कोकाटे नॉट रिचेबल असून, त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती आहे. पुढील एका तासात न्यायालयाचा निर्णय अपेक्षित आहे.