BMC Election 2026 : मुंबईतल्या या जागांवरुन भाजप-एकनाथ शिंदे शिवसेनेत एकमत नाही

BMC Election 2026 : मागच्या दोन-तीन वर्षांपासून मतदार आणि राजकीय पक्षांना ज्या निवडणुकीची प्रतिक्षा होती, ती जाहीर झालीय. मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला. येत्या 15 जानेवारी मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी आहे. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक देशात प्रतिष्ठेची मानली जाते.