नवाब मलिकांवरील आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत, असे सना मलिक यांनी म्हटले आहे. यामुळे मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्यास भाजपचा विरोध कायम आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या बैठका सुरू असून, महायुतीमधील जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्येही पेच निर्माण झाला आहे.