मंत्री माणिकराव कोकाटे यांना १९९५ सदनिका गैरव्यवहार प्रकरणात अटक वॉरंट जारी झाल्यानंतर ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. अकराव्या मजल्यावर त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस त्यांच्या शोधात असून, न्यायालयाच्या आदेशाची प्रत मिळाल्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.