भारतातील प्रसिद्ध गेमर पायल गेमिंग एका व्हायरल एमएमएसमुळे चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये ती नसल्याचे पायलने स्पष्ट केले आहे, तिच्या नावाचा आणि फोटोचा गैरवापर केला जात आहे. तिने याविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. पायलने हा व्हिडिओ शेअर न करण्याचे आवाहन केले असून, ऑनलाइन गैरवापरामुळे होणाऱ्या भावनिक त्रासावरही प्रकाश टाकला.