नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!

नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. आयएसआय मद्रास टायगरच्या नावाने आलेल्या ईमेलनंतर तात्काळ बॉम्बशोधक आणि श्वान पथकांनी न्यायालयाच्या परिसराची कसून तपासणी सुरू केली आहे. सध्या कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नसून, धमकीच्या मेलमागील उद्देशाचा तपास सुरू आहे.