त्यांच्यासोबत जाणं आम्हाला परवडणारं नाही! नवाब मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान

संजय शिरसाट यांनी नवाब मलिक यांच्याशी युती करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. राष्ट्रप्रेमाच्या गप्पा मारत असताना मलिक यांच्यासोबत जाणे परवडणारे नाही, असे त्यांनी म्हटले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुती हिंदुत्व, मराठी माणूस आणि मुंबईचा विकास या मुद्द्यांवर लढणार आहे. त्यांनी प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाचे समर्थन करत विरोधकांवर टीका केली.