काँग्रेसमधील सद्यस्थितीवर खासदार अशोक चव्हाण यांनी चिंता व्यक्त केली. काँग्रेसला भविष्य दिसत नसल्याने अनेक नेते भाजपमध्ये जात आहेत. नाना पटोले यांच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे काँग्रेसची राज्यात डबघाई झाली, अशी टीका चव्हाण यांनी केली. पक्षातील नेतृत्वाला दिशाहीन म्हटले, तर जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला तिकीट देण्याची भूमिका त्यांनी मांडली.