मुंबई महानगरपालिका निवडणूक 2025 साठी ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील जागावाटपाचा तिढा वाढला आहे. ठाकरे सेनेच्या आमदारांच्या मतदारसंघात मनसेने माहीम, विक्रोळी आणि शिवडी या तीन जागांची मागणी केली आहे. या पेचावर तोडगा काढण्यासाठी आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे.