ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा जागा वाटपामुळे अडकली आहे. मनसेने जागा वाटप पूर्ण होईपर्यंत घोषणा नको अशी भूमिका घेतली आहे. मुंबईतील भांडूप, माहीम, विक्रोळी, शिवडीसह काही मतदारसंघात ठाकरे गट आणि मनसेमध्ये जागांवर तिढा आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बैठकीत तोडगा काढला जाणार आहे.