मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीतील जागावाटपावरून शिंदेसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. 2017 मध्ये शिवसेनेने जिंकलेल्या 84 जागा शिंदे गटाला देण्यास भाजपने नकार दिला आहे. सन्मानजनक जागा न मिळाल्यास सर्व 227 जागा स्वबळावर लढण्याचा शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चेतून तोडगा निघेल असा विश्वास व्यक्त केला.