बारामती नगरपरिषदेसाठी आज मतदान होत असून, उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत उपस्थित आहेत. येथे पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे. युगेंद्र पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले, मात्र विजयाचा विश्वास व्यक्त केला.