BMC Election 2025 : मुंबईत ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, ‘या’ ठिकाणी शिंदे सेना अन् BJP समसमान जागा लढणार

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना यांनी समसमान जागा लढवण्याची रणनीती आखली आहे. लालबाग, परळ, दादर, माहीम, भायखळा आणि वरळी यांसारख्या प्रमुख भागांमध्ये दोन्ही पक्ष समान जागांवर उमेदवार उभे करणार आहेत.