Prithviraj Chavan : PM मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एप्स्टीन फाईल्स प्रकरणावरून पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट सवाल

पृथ्वीराज चव्हाण यांनी एप्स्टीन फाईल्समध्ये काही उच्च पदस्थ भारतीय व्यक्तींची नावे असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अमेरिकन माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण भारताच्या राजकारणावर गंभीर परिणाम करू शकते. बाल लैंगिक शोषणाचे पुरावे समोर आल्यास कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे, तसेच पंतप्रधान मोदींच्या नावावरूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.