Jeffrey Epstein Files Release: अमेरिकी न्याय विभागाने जेफ्री एप्सटीन प्रकरणाशी संबंधित फाइल्स जारी करण्यास सुरुवात केली आहे. कागदपत्रांमध्ये बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रंप आणि मायकेल जॅक्सन यांसारख्या नावांचा उल्लेख आहे, मात्र मोठ्या प्रमाणात रेडॅक्शनमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकारचे म्हणणे आहे की पीडितांच्या सुरक्षिततेसाठी माहिती काढून टाकली गेली आहे.