राज आणि उद्धव ठाकरे आगामी महानगरपालिका निवडणुकीत मराठी आणि मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी रणनीती आखत आहेत. मुंबई महानगरपालिकेतील २२७ वॉर्डांपैकी ४१ वॉर्डांमध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे, तर ७२ वॉर्डांमध्ये मराठी मतदारांचे वर्चस्व आहे. ठाकरे बंधू जागावाटपाचे सूत्र ठरवताना या मराठी-मुस्लिम फॅक्टरला प्राधान्य देत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.