महाराष्ट्र नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. या निकालातून अनेक नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कुणाचा मुलगा, बायको किंवा निकटवर्तीय मैदानात असल्याने दिग्गज नेत्यांना मोठा ताण आला आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.