महायुतीने नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांत घवघवीत यश मिळवले. मात्र, भाजपने वारंवार घराणेशाहीला स्थान नसल्याचा दावा केला असला तरी, या निकालांनी वेगळेच चित्र समोर आणले. अनेक भाजप मंत्री आणि आमदारांच्या पत्नी, सून, मुलगी किंवा नातेवाईक बिनविरोध निवडून आले, ज्यामुळे पक्षाच्या "पार्टी विथ डिफरन्स" या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.