मुंबई लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढलेल्या एका पुरुषाने विरोध केल्याने 18 वर्षीय तरुणीला धावत्या ट्रेनमधून खाली ढकलले. या धक्कादायक घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून, इतर महिला प्रवाशांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणामुळे मुंबईतील महिलांच्या सुरक्षित प्रवासावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.