नितेश राणे यांनी केलेल्या एका सूचक ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पक्षाच्या, नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, असे ते म्हणाले आहेत. काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात, या त्यांच्या विधानामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.