घोड्यांच्या विक्रीतून 4 कोटी… ‘अश्वपंढरी’ सारंगखेडाच्या यात्रेत ऐतिहासिक उलाढाल

सारंगखेडा घोडेबाजारात यंदा 4.24 कोटी रुपयांची ऐतिहासिक उलाढाल झाली. 756 घोड्यांची विक्रमी विक्री झाली असून, या यात्रेला 'अश्वपंढरी' म्हणून ओळख मिळाली आहे. दक्षिण भारतातील व्यापारी मोठ्या संख्येने येऊन दर्जेदार घोड्यांची खरेदी करत आहेत, ज्यामुळे हा बाजार देशातील सर्वात मोठा आणि प्रसिद्ध घोडेबाजार बनला आहे.