राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होताच महायुतीचा विजय झाला. बीडमध्ये धनंजय मुंडेंनी गड राखला. यानंतर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी बजरंग सोनवणे, प्रकाश सोळंके आणि विजयसिंह पंडितांना मनोज जरांगेच्या नादी लागल्यास २०२९ मध्ये घरी बसावे लागेल असा इशारा दिला. त्यांनी जरांगेंना 'बिनडोक' म्हणत ओबीसींना त्रास देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार असल्याचे ठणकावून सांगितले.