Dobivli News : भटक्या कुत्र्याने तोडला खांद्याचा लचका, 5 वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, उपचार सुरू असतानाच…

दिवा येथे भटक्या कुत्र्याच्या चाव्याने एका ५ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. महिनाभर उपचार आणि चार इंजेक्शन दिल्यानंतरही तिची प्रकृती बिघडली. यामुळे उपचार पद्धतीवर आणि महापालिकेच्या डॉक्टरांच्या कार्यपद्धतीवर नातेवाईकांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांत संताप असून, या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी होत आहे.