चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीतील दारुण पराभवानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली आहे. मंत्रीपद न मिळाल्याची खदखद आणि पक्षातील इनकमिंगवर त्यांनी बोट ठेवले. भाजपने शनिशिंगणापूरप्रमाणे दरवाजे उघडे ठेवल्याने कोणीही येत असल्याचे त्यांनी म्हटले. यामुळे विदर्भातील भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.