Amit Satam : भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, दादरमध्ये कामगार मेळाव्याचा ‘तो’ व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दादर रेल्वे स्थानकावर बूटपॉलिश करून बूटपॉलिश करणाऱ्या कामगारांच्या मेळाव्याची अनोखी सुरुवात केली. भाजपने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात साटम यांनी एका व्यक्तीचे बूटपॉलिश करत उपस्थितांचे लक्ष वेधले. हा मेळावा कामगारांशी संवाद साधण्यासाठी होता.