Eggs Price: थंडीत अंड्याचे भाव कडाडले, अंड्याचा भाव शंभरीवर, किंमती ऐकून खवय्यांना हुडहुडी

Eggs Rate: कडाक्याच्या थंडीत अंड्याचे भाव सुद्धा कडाडले आहेत. एक डझन अंड्याचा भाव शंभरीवर गेला आहे. त्यामुळे खवय्यांना हुडहुडी भरली आहे. थंडीत अंड्यांची मागणी वाढली असली तरी पुरवठा कमी असल्याने अंड्याचे दर भडकल्याचा दावा व्यापारी करत आहेत.