बीड येथील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात वाल्मीक कराड व त्यांच्या साथीदारांवर अखेर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ही माहिती दिली. खंडणी वसुलीस अडथळा ठरल्याने संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. आरोपींनी खटला लांबवण्याचे प्रयत्न केले होते, ज्याला न्यायालयाने चाप लावला.