उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांच्या युतीची घोषणा उद्या दुपारी १२ वाजता होणार आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. आगामी महानगरपालिका निवडणुका एकत्र लढण्यासाठी ही युती होत असून, एका पत्रकार परिषदेद्वारे घोषणा होण्याची शक्यता आहे. जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे नेत्यांनी म्हटले आहे.