Dhurandhar : थिएटरनंतर आता ओटीटीवर ‘धुरंधर’चा धुमाकूळ; कधी अन् कुठे होणार स्ट्रीम?
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ब्लॉकबस्टर ठरलेल्या या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. रणवीर सिंह, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, राकेश बेदी यांच्या दमदार कामगिरीचं कौतुक होत आहे.