Top 7 Calcium-Rich Foods: थंडीत हाडे किंवा सांध्यात तीव्र वेदना होत असतात. केवळ साठीला आलेले लोक नव्हे तर हल्ली तरुणांमध्ये देखील सांधेदुखी दिसत आहे. ज्याचे सर्वात मोठे कारण कॅल्शियमची कमतरता हे आहे. लोक बॉडी बनवण्यासाठी प्रोटीन तर घेत असतात. परंतू कॅल्शियमकडे त्यांचे साफ दुर्लक्ष असते. आरामदायी जीवनशैलीने सकाळचे कोवळे ऊन्हात फिरणे होत नसल्याने डी जीवनसत्वाची देखील शरीरात कमतरता होते.त्यामुळे कमी वयात हाडे ठीसूळ होतात. ज्यांना दूध आणि दूधाचे पदार्थ वर्ज्य आहेत. त्यांच्या कॅल्शियम असलेले 7 पदार्थ वरदान ठरतील.