माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की अनिल पाटलांना पुन्हा मंत्रिपद मिळावे. माणिकराव कोकाटे यांच्यानंतर रिक्त असलेले आणि सध्या अजित पवारांकडे असलेले क्रीडा मंत्रीपद मिळवण्यासाठी अनिल पाटील उत्सुक असल्याचे या भेटीतून समोर आले आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.