Shivsena Vs BJP in Kalyan: गेल्या काही दिवसांपासून ठाणे, कल्याण आणि मुंबईत भाजप आणि शिंदे सेनेत चांगलंच वाजल्याचे अनेकदा समोर आले आहे. भाजपने शिंदे सैनिकांना जवळ केल्यानंतर हा वाद पेटला होता. शिंदे थेट दिल्लीत पोहचले होते. त्यानंतर वादावर पडदा पडला. पण कल्याणमध्ये मात्र वाद संपता संपलेला नाही. येथे दोन्ही पक्षांमध्ये चांगलाच कलगीतुरा दिसून आला.