Sanjay Raut: त्या पक्षाचा बापच अनौरस, मनसे-शिवेसना युती होताच शिंदे सेनेवर संजय राऊतांनी डागली तोफ, फडणवीसांवर अशी केली बोचरी टीका

Sanjay Raut Criticized Eknath Shinde: मनसे आणि उद्धव सेना एकत्र आल्याने सध्या दोन्ही पक्षात चैतन्याचे वातावरण आहे. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना जणू शंभर हत्तीचं बळ आलं आहे. आज खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि आमदारांविरोधात तुफान फटकेबाजी केली. त्यामुळे महापालिका निवडणुकीत मोठ्या शा‍ब्दिक चकमकी होण्याची शक्यता दिसत आहे.