पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने या संभाव्य आघाडीला विरोध केला आहे, तर शरद पवार गटाच्या पुरोगामी विचारधारेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला असून, सुप्रिया सुळे यांनी मात्र याबाबत मोघम उत्तरे दिली आहेत.