बुलढाणा जिल्ह्यात नवनिर्वाचित काँग्रेसचे नगराध्यक्ष आतिक जवारीवाले यांचा नोटा उधळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विजय मिरवणुकीत त्यांनी नोटा उधळल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही घटना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे.