Maharashtra Politics: कालचा शत्रू आजचा मित्र, कालचा मित्र आजचा शत्रू… महाराष्ट्रातील राजकारणाचा असा झाला विचका

Shivsena-MNS-BJP-NCP-Congress-Vanchit : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटावर नवीन संगोट्या फेकल्या गेल्या आहेत. राजकीय समीकरणं वेगानं बदलत आहेत. राज्याच्या राजकारणाने 2019 पासून इतक्यांदा मोठी कूस बदलली आहे की, आता छोटे-मोठे धक्के अगदीच किरकोळ वाटतात. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एक नवीन समीकरण मांडलं आहे. राज्याच्या राजकारणाचा पुरता विचका झाला आहे.