चालकाला डुलकी लागल्याने भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील सोंडो गावाजवळ पहाटे भीषण अपघात झाला. चालकाला डुलकी आल्याने बोलेरो पुलावरून खाली कोसळली, ज्यामध्ये तेलंगणातील कागजनगर येथील ४ महिलांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी आहेत.