Photo : आई आजारी आहे…असशील तसा निघून ये… पत्र पाठवलं, पण मिळालंच नाही… पोस्टमनच्या घरात सापडले चक्क तीन पोती टपाल; एकच खळबळ

पांढरकवडा येथे टपाल विभागाच्या विश्वासार्हतेला तडा देणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोस्टमन सतीश धुर्वे याने शेकडो नागरिकांचे महत्त्वाचे टपाल, कायदेशीर नोटीस आणि बँकिंग कागदपत्रे वाटप न करता आपल्या घरात साठवून ठेवल्याचे समोर आले आहे.,