Pune Local Body Election : पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?

पुण्यामध्ये ठाकरेंची सेना आणि मनसे युती करणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे 74, तर ठाकरेंची सेना 91 जागांवर लढणार आहे. युतीचा हा प्रस्ताव उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे, ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात नवे समीकरण उदयास आले आहे.