पुणे पालिका निवडणुकीसाठी भाजपने ११५ उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत, ज्यावर देवेंद्र फडणवीस शिक्कामोर्तब करणार आहेत. शिवसेना ३५ जागांची मागणी करत असून, भाजप १८ जागा देण्यास तयार असल्याने युतीत अडचणी येत आहेत. दुसरीकडे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काँग्रेस स्वतंत्र लढणार, असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.