Tejasvees Ghosalkar Posters : अभिषेक घोसाळकर यांचा मरणोत्तर भाजप प्रवेश झाला का? तेजस्वी यांच्या पोस्टरवर पतीच्या फोटोला ठाकरे सेनेचा विरोध

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर यांच्या समाज माध्यमांवरील पोस्टरवर त्यांचे दिवंगत पती अभिषेक घोसाळकर यांचा फोटो वापरण्यात आला आहे. यावर ठाकरे सेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. "अभिषेक घोसाळकर यांचा मरणोत्तर भाजप प्रवेश झाला का?" असा सवाल करत ठाकरे सेनेने हा फोटो वापरण्यास विरोध दर्शवला आहे.