BMC Election: कशासाठी केला हा अट्टहास? मुंबई महापालिकेवर शिंदेसेनेचा महापौर नाहीच, महायुतीच्या फॉर्म्युलातच मोठा गेम

Mumbai Municipal Corporation Mayor: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचं जागांचं आडलेलं घोडं एकदाचं पुढं दामटलं.मुंबईसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास ठरला आहे. पण या फॉर्म्युल्यावर नजर टाकल्यावर मोठा गेम झाल्याचं लक्षात येईल. मुंबईवर शिवसेनेचा भगवा फडकणारच नाही. महापौरही होणार नाही, हे आता काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.